Witty Kids Classes बद्दल पालकांच्या प्रतिक्रिया
“माझा मुलगा धीरज 'विट्टी किड्स' क्लासला जातो आणि तिथे त्याच्यामध्ये झालेली प्रगती पाहून मी खूप समाधानी आहे. पूर्वी
त्याला हिंदी विषयाची खूप भीती वाटायची, पण आता तो स्वतःहून हिंदी वाचू आणि लिहू शकतो. निशा मॅडम गणित इतक्या सोप्या
पद्धतीने शिकवतात की मुलांची विषयातील गोडी वाढते.फक्त अभ्यास न घेता ते वेगवेगळे ऍक्टिव्हिटी पण घेतात.
इंग्रजीमध्ये 'This/That.. इ' असे शब्दांचा वापर आणि त्यांचे अर्थ मॅडमनी इतके स्पष्ट केले आहेत की धीरजच्या सर्व संकल्पना
(Concepts) क्लिअर झाल्या आहेत. अभ्यासासोबतच विषयाची आवड निर्माण करण्याकडे मॅडमचे विशेष लक्ष असते. मुलांचा
पाया मजबूत करण्यासाठी निशा मॅडम घेत असलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. उत्तम मार्गदर्शनासाठी धन्यवाद!"
ऐश्वर्या आरबोळे
माझ्या मुलीच्या अभ्यासात तुमच्यामुळे खूप सुधारणा झाली आहे. तुम्ही शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी आणि छान आहे. तुम्ही
घेत असलेल्या मेहनतीबद्दल मनापासून आभार!
पूजा
I would like to express my sincere thank you to Witty kids classes. This tuition class is not just about
studies, it’s about building confidence and shaping the future. The constant encouragement and
clear teaching style have made learning stress-free and effective. Thank you for the dedication and
support!
Kshitija
माझी मुलगी श्वेता इयत्ता ७वीमध्ये शिकत आहे. गणित आणि इंग्रजी विषयासाठी मी तिचा Witty Classes मध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून तिच्या अभ्यासात दिवसेंदिवस उल्लेखनीय प्रगती दिसत आहे. शाळेतील शिक्षकांनीही तिच्या या प्रगतीबद्दल विशेष कौतुक केले आहे. Witty Classes मुळेच तिच्यात हा सकारात्मक बदल घडला आहे.”
शीला
“माझा मुलगा अविरलला बोलण्यात थोडी अडचण होती. त्याला शब्दांचे उच्चार व्यवस्थित करता येत नव्हते, त्यामुळे नेमकी समस्या काय आहे हे आम्हाला समजत नव्हते. रेफरन्समुळे आम्ही त्याला Witty Kids Classes मध्ये दाखल केले आणि निशा मॅडमना भेटलो. त्यांनी अविरलच्या शिकवणीला एक आव्हान म्हणून मनापासून स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अविरलमध्ये खूप चांगला आणि सकारात्मक बदल दिसून येत आहे.”
साक्षी वायकुळे
